___ठाणे(जिमाका):- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board(SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनात महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. १२ फेब्रुवारी २०२० ते २१ फेब्रुवारी २०२० या कालावधीत SSB कोर्स क्र. ५२ आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची निशुल्क सोय करण्यात आली आहे. ___ठाणे, पालघर जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैलिक कल्याण कार्यालय ठाणे येथे दिनांक ०७ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Facebook पेज वर Department of Welfare Sainik Pune(DSW) वर सर्च करून त्यामधील SSB-52 कोर्ससाठी(किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरून सोबत घेऊन यावे. केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेऊन यावे.
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी