मीरा-भाईदरमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

गर्दी कमी होत नसल्याने आयुक्तांचा निर्णय ____ भाईंदर - राज्यात व मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस खुपच वाढत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी जगभरात लॉकडाऊन घोषीत केला आहे. परंतु अनेक ठिकाणी लोक नियमांचे उल्लंघन करुन ठिक ठिकाणी गर्दि करत असताना दिसत आहेत. अशा प्रकारेच मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना देखील शहरातील लोकांची गर्दी वाढतच असल्याने याला आळा घालण्यासाठी मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांनी शहरातील लॉकडाऊन कडक करण्याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे कुणालाही आता अजिबात बाहेर फिरता येणार नाही. शहरातील आत्यावश्यक सेवा देखील बंद करण्यात आल्या असून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सर्व दुकाने बंद रहाणार आहेत.