_ मुंबई- टाळेबंदीनंतर अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी सरकारने निवाऱ्याची सोय केली असली त्याची माहिती या मजुरांपर्यंत पोहोचली नसल्याने त्यांना रस्त्यावर दिवस काढावे लागत आहेत. घरी जाण्यासाठी वाहतुकीची साधनेच उपलब्ध नसल्याने अनेक मजुरांनी दादर रेल्वे स्थानकाबाहेरील फुटपाथवर घरोबा केला आहे. __टाळेबंदीमुळे अचानक वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने अडकलेले मजूर घरी जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतील मजूरही दादर स्थानकात मागील दहा दिवसांपासून अडकून पडले आहेत. खानदेशच्या ६० वर्षीय प्रमिला जाधव १८ मार्चपासून दादर पूर्वच्या पदपथावर बसून आहेत. पाडव्याच्या निमित्ताने कडुलिंबाचा पाला विकण्यासाठी आलेल्या प्रमिला सांगतात, 'पाला विकून आलेले सगळे पैसे आता संपत आले आहेत. वयानुसार जास्त धावपळ होत नाही, मात्र पोलीस
स्थलांतरित मजर अजूनही वायावर